पुणे महाराष्ट्र

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या- अजित पवार

पुणे | दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका, असं अजित पवार म्हणालेत.

कोरोनाच्या काळात मी खूप काळजी घेतली. पण तरीही एवढी काळजी घेऊन देखील मला कोरोनाची बाधा झालीच. माझ्यानंतर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांना देखील कोरोनाची बाधा झाली. पुणेकर मंडळींनी दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

मागील काही दिवसांत अनेक निष्पाप लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आपण जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले आहे. आरोग्य यंत्रणेनेही चांगलं काम केलंय. त्यांनाही पुणेकरांनी सहकार्य करावं, असं अजित पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘सरकारची भूमिका लोकविरोधी आहे’; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार रहा; मनसेचा सरकारला इशारा

रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक, म्हणाले…

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या