बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तर नेटफ्लिक्सकडून अजित पवारांना 2-3 कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या राष्ट्रवादीवर आरोपांच्या फेऱ्या झाडताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चढवलं आहे.

जरंडेश्वर कारखान्याचे मालक सुनेत्रा अजित पवार आणि अजित अनंतराव पवार आहेत. 90 टक्के शेअर्स 27 लेअर नंतर शेवटी स्पार्किंग सोईलकडे असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते, असा टोला देखील सोमय्यांनी लगावला आहे. तर यातला सीजन 1 हा अजित पवारांचा असेल, असा सुचक इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राचे गुरू आहेत. त्यांना गुरू म्हटलं जातं. मंत्र्याच्या व्यवसायावर प्रतिबंध नाही, पण मंत्रीपदाचा गैरफायदा घेणं हे चुकीचं आहे, असंही सोमय्या म्हणाले आहेत. बहिणींच्या नावानं बेनामी संपत्ती करणं हे दुर्देव आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी केली. आता पुढील खुलासा अजित पवार यांनी करावा, असं आव्हान सोमय्या यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

दरम्यान, येत्या काळात पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार असा इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More