बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सर्व जहाल मुद्दे एकाच ठिकाणी

मुंबई | राज्यात विजयादशमीचा उत्साह सर्वत्र आहे. शिवसेनेचा दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा हा पार पडला. यावर्षी हा मेळावा षन्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 टक्के कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.

आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. स्वत:मध्ये हिंमत असेल तर आव्हान द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ईडी सीबीआयच्या मागं लपू नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागं लपायचं हे शिवसेनेच्या रक्तात नाही. विचार एक आहेत म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली. शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता, असा टोला देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी लगावला आहे. केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय. मी शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवेन म्हटलो होतो आणि ते वचन मी पूर्ण करणारच, असं मी त्यांना वचन दिलं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

माझं भाषण संपण्याची काहीजण वाटत पाहात आहेत. माझं भाषण संपतो कधी आणि मी चिरकतोय कधी, याची अनेकजण वाट पाहात आहेत. पण माझा वाडा चिरेबंदी आहे, असंही ठाकरे म्हणाले. मोहनजी टीका करतोय पण वाईट वाटून घेऊ नका. आपण मेळाव्यात विचार मांडतो ते पाळणार नसेल तर दसरा मेळाव्यांची काय गरज? हिंदूत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का?, असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

लखीमपूरच्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? भाजपच्या नेत्यांसाठी संघानं शिकवण लावावी. सत्तेचं व्यसन हा आमली प्रकार आहे. या आमली प्रकाराचा बंदोबस्त कुणी करायचा? अनेक प्रयत्न केले फोडण्याचे आणि पाडायचे, असंही ठाकरे म्हणाले. हर हर महादेव म्हणजे काय असतं हे दिल्लीतच्या दख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये आणि आली तर मागे हटणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे. 1992 साली शिवसैनिकांनी मुंबई वाचवली होती. देव, देश आणि धर्मासाठी शिवसैनिकाचा जन्म झाला. कुणाच्या पत्नी मुलांवर आरोप करणं हिदुत्व नाही याला नामर्दपणा म्हणतात, अशी जहरी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. माफ करा पण वडिलोपार्जित शब्दांची संपत्ती आहे ते वापरु द्या. शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही. शिवसैनिकाला तुम्ही भ्रष्ट ठरवता कारण तो तुमच्या पालख्या वाहत नाही. जगातला सर्वात मोठा पक्ष पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी उमेदवार नाही, उपरे आणावे लागतात, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

हिंदूत्व रक्तात असावं लागतं. रक्तदान करणं हा धर्म आहे. ठाण्यात नवरात्रीच्या नऊ दिवस शिवसेनेकडून विक्रमी रक्तदान शिबीर झालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. राज्यपालांनी मला पत्र लिहून महिला अत्याचारांवर दोन दिवसाचं अधिवेशन घ्यायला सांगितलं. हा शिवरायांचा महाराष्ट्र महिला अत्याचार करणाऱ्यांना माफी नाही. त्यांना फासावर लटकवणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र राज्यपालांनी मोदींना पत्र लिहून संसदेचं अधिवेशन घ्यायला सांगायला पाहिजे होतं. तिथं काही कायदा करता येतो का याबाबत विचार करायला हवा होता. महाराष्ट्रात लोकशाही खून होत असेल तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का ? लखीमपूर, प्रियांका अटक, अखिलेश यादवांच्या घरापुढे पोलिसांचा मोठा पहारा यांचा संदर्भ ठाकरेंनी दिलाय. आपला आवाज कुणी दाबू शकत नाही आणि असा कुणी जन्माला आला नाही. छापा टाकायचा की काटा? हा प्रकार जास्त काळ चालू शकत नाही. केंद्रा एवढीच राज्य सार्वभौम राहतील असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. 75 वर्षात आपण काय केलं यावर उहापोह व्हायला हवा. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही आणि भारत माता की जय ओरडायचं केंद्राच्या राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करणं घटनाबाह्य असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कुणी अंगावर आलं तरच शिवसेना शिंगावर घेते. संपूर्ण जगात माझ्या महाराष्ट्रात गांजा चरस यांना व्यापार चालतोय, असं चित्र संपूर्ण जगात करायचा उद्योग चाललाय. इकडं चिमूटभर गांजा हुंकत होता तेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसांनी कोट्यवधीची ड्रग्ज जप्त केली, असंही ठाकरे म्हणाले आहेत.

कुणावर टीका करायची म्हणून मी बोलत नाही, पण आतातरी सुधरा. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. आपला देश सर्वात तरुण पण त्यांच्याकडे काम नाही. त्यांना काम नसणं हा मोठा बॅाम्ब ठरु शकतो आणि लक्षात ठेवा तो तुमच्या बुडाखाली फुटेल, अशी जहरी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, मुलगी शिकली प्रगती झाली पण तिच्या हाताला काम कुठंय. तिनं काही चुकीचं काम केलं तर सत्ताधारी म्हणून त्याला जबाबदार आहोत. आपण महाराष्ट्राला पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आणि हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. कुणी वार करायला आला तर त्याची तलवार मोडून तोडून त्याचं पार्सल परत पाठवण्याची धमक तुमच्यात आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारला.

थोडक्यात बातम्या-

“मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत”

“महाराष्ट्रात लोकशाहीचा खून तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?”

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

“शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही”

“सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही”

“गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडलं त्यावर का बोलत नाहीत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More