बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या!

नागपूर | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी फडणवीसांविरोधात तक्रार करण्यात आली होती. आज देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.

ॲड. सतिश उके यांनी यासंदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी व न्यायालयाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही तक्रार योग असल्याचं सांगत हे प्रकरण नागपूर कनिष्ठ न्यायालयाकडे सोपवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातंर्गत नागपूर येथील सत्र न्यायालयाने फडणवीसांवरील आरोप निश्चित केले आहेत.

फडणवीस यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली होती. नंतर फडणवीसांना जामिन देण्यात आला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीत फडणवीसांविरोधात चार्ज फ्रेम करण्यात आले. त्यावर फडणवीसांच्या वकिलांनी हा गुन्हा मान्य नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण- पश्चिम नागपूरहून निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेले 2 फौजदारी गुन्हे लपवले असल्याची तक्रार उके यांनी केली होती. आता नागपूर सत्र न्यायालयाने फडणवीसांवरील आरोप निश्चितीचा आदेश पारित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

ओमिक्रॉन संकटाबाबत देशपातळीवर निर्णय घेणं गरजेचं -अजित पवार

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात Omicron चा संसर्ग होऊ शकतो’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचा मोठा निर्णय; स्वीकारणार हिंदू धर्म

फक्त ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More