बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

पुणे | अमित शहा काय देशाचे मालक नाहीत, प्रत्येकजण मालक आहेत. तुम्ही फक्त खुर्चीवर आहेत. त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचे आहे, असा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

सरकारच्या कठोर निर्बंधांसह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप ‘कॉपी कॅट’ आहे. इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे, पुण्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहेत तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहेत. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, सरकार लॉकडाऊन बाबत वंचितसोबत बोललेले नाहीत, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही, अशा शब्दात आंबेडकरांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

थोडक्यात बातम्या – 

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही; रुग्णांसाठी हाॅटेल्स घेतल्या भाड्याने

“ठाकरे सरकारची स्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही अशी झालीये”

सेल्फी काढायला आलेल्या राखीने चाहत्याला सुनावले खडेबोल, पाहा व्हिडीओ

ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी त्यांने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More