बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

मुंबई | राज्यभरातून पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक वृत्तपत्रांचे वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी ही मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केली आहे. आता या विषयी राज’पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

‘कोरोना महासाथीविरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस याप्रमाणेच आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत आणि वार्तांकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत, त्यामुळं त्यांना राज्यातील पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करावं’, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

‘या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. दु्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना कोरोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत’, असंही अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसंच वार्तांकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर्सच्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहा पत्र-

थोडक्यात बातम्या-

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा”; यूट्यूबची मोठी घोषणा

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका, “केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More