‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस आता लवकरच झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात झळकणार आहेत.
अमृता फडणवीस यांच्यासह देवेंद्र फडणवीसही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने अमृता फडणवीसांना एक मजेशीर प्रश्न विचारला.
एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात?, असा प्रश्न संकर्षण कऱ्हाडेने अमृता फडणवीसांना विचारला. यावेळी देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या पातेलंभर तूपासोबत सहज खायचे, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
दरम्यान,किचन कल्लाकारच्या या भागात संकर्षण कऱ्हाडेसह प्रशांत दामलेंनीही अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीसांना बुचकळ्यात टाकणारे अनेक प्रश्न विचारले आहेत. किचन कल्लाकारचा हा भाग झी मराठीवर आज रात्री प्रदर्शित होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या तरूणाने केला खळबळजनक दावा
अमृता फडणवीसांनी राऊतांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मामी गप्प बसा’
‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या
“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”
‘बाप बेटे जेल मधे जाणार’, संजय राऊतांचं सूचक ट्विट
Comments are closed.