बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशमुखांच्या 100 कोटीत शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हिस्स्याची चौकशी झाली पाहिजे”

मुंबई | अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांना पाच समन्स मिळूनही त्यांनी चौकशीला जाण्याचं टाळलं आहे. देशमुख यांनी त्यांच्या वकिलांकडून अंमलबजावणी संचालनालयाला तीन पानांचं पत्र पाठवलं आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला सुद्धा समन्स बजावलं आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची कितपत भागीदारी होती याचीही चौकशी व्हायला हवी, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अंमलबजावणी संचालनालयाकडून अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉन्ड्रींग कायद्याद्वारे चौकशी करत आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात करण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. भातखळकरांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

“शिवरायांप्रमाणे मलाही स्वकियांनी त्रास दिला”; शिवसेना सोडताना आशाताई आक्रमक

“तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे”

शिवसेनेला मोठा धक्का, आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेला ‘हा’ चेहरा भाजपमध्ये!

“युतीत असताना आमचा श्वास कोंडत होता, आता मोकळा श्वास घेतोय”

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More