महाराष्ट्र मुंबई

‘ती’ अभिनेत्री काय नाव घ्यायच्या लायकीची नाही- अनिल देशमुख

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कंगणा राणावतवर नाव न घेता निशाणा साधल्याचं दिसून आलं. तसेच देशमुखांनी भाजपने घेतलेल्या भूमिकेवरून भाजपचा उल्लेख न करता टीका केली आहे.

मी त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचा प्रश्न नाही, ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे कंगणावर टीकास्त्र सोडलं आहे.

ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही. नाव न घेता एवढच सांगतो. की ज्या पद्धतीने मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचं काम, मुंबई पोलिसाला माफिया म्हणण्याचं काम ज्या कुणी व्यक्तीनं केलं. एकाप्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेला दुखवण्याचं काम केलं. अशा या व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचं काम करतो. तर त्याचा देखील विचार समाजाने करायला पाहिजे, असं अनिल देशमुख म्हणालेत.

आपण सांगितलं की सर्व समाजाने तिचा धिक्कार केला पाहिजे, ही खरी गोष्टं आहे. पण राजकीय फायदासाठी जर काही गोष्ट अशा पद्धतीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन होत असेल, तर हा सुद्धा एक गंभीर विषय आहे, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुक्त भाजप आमदाराचा प्रताप; विनामास्क मंदिरात केला डान्स

‘देवा…बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे’; बच्चू कडूंसाठी रडत प्रार्थना करणाऱ्या मुलाचा व्हीडिओ व्हायरल

IPL2020- नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हेन पंजाबची प्रथम गोलंदाजी

106 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात!

‘अनुराग कश्यपला अटक करा’; कंगणा राणावतची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या