Top News

कोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख

मुंबई | कोरोनाच्या लढाईत पोलीस थकले आहेत, पण हिंमत हरलेले नाहीत, असा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाच्या काळात गेल्या साडेपाच ते सहा महिन्यांपासून पोलीस कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र रस्त्यावर उतरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. या कालावधीत पोलीस दलातील 208 सहकारी या आजारामुळे शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी गृह विभाग आवश्यक ते प्रयत्न करत आहेत. पोलीस वेल्फेअर फंडातून यासाठी 65 लाख रूपयांची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी निवासस्थान सोडण्याचं कोणतंही बंधन घालण्यात आलेलं नाही, असं देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

IPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात

“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या

राज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या