देश

ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा

पश्चिम बंगाल | मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला मंगळवारी आणखी एक मोठा हादरा बसला. राज्याचे युवक सेवा आणि क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे सोपवला आहे.

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय माजी मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरल्यानंतर 16 दिवसांनी माजी रणजीपटू शुक्ला यांनी राज्याचं मंत्रिपद सोडलं आहे. मात्र अद्याप त्यांनी तृणमूलच्या आमदारपदाचा राजीनामा दिलेला नाही.

लक्ष्मी रतन शुक्ला हे क्रीडापटू आहेत. त्यांनी खेळासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा कोणीही देऊ शकतो. त्यांच्या राजीनाम्याचा संबंध कुणी पक्षातील नाराजीशी जोडू नये. ते तृणमूलच्या आमदारपदावर कायम राहणार आहेत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या