या अभिनेत्याच्या मनात कधीच घर करु शकली नाही श्रीदेवी!

मुंबई | आपल्या दमदार अभिनयाने श्रीदेवींनी अनेकांच्या मनात घर केलं. मात्र एक व्यक्ती अशी होती की त्याचं मन श्रीदेवी कधीच जिंकू शकल्या नाहीत. ते नाव म्हणजे त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूर.

अर्जुन कपुर 11 वर्षाचा असताना बोनी कपूर यांनी मोना कपूर यांना घटस्फोट दिला. त्यामुळे अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवींविषयी खूप तिरस्कार होता.

वेळेनुसार माणसाच्या मनातला तिरस्कार कमी होतो, असं म्हणतात. गेल्या 22 वर्षांपासून अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवीविषयी जो तिरस्कार होता, तो कधीही कमी झाला नाही. मात्र आता हे सारं विसरुन तो आता कुटुंबाच्या दु:खात सहभागी झालाय.