बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान!

नवी दिल्ली | दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर हजारो दिल्लीकर नागरिकांच्या साक्षीने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या दिल्लीकरांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला.

अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या 6 नेत्यांनी थपथ घेतली. यामध्ये मनीष सिसोदीया, सतेंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि राजेंद्र गौतम या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, सकाळी केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्यास येण्याचं आवाहन केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको- अजित पवार

अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार!

महत्वाच्या बातम्या- 

खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात आंदोलन; पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”

शरद पवारांची ‘ती’ मागणी वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंची डोकेदुखी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More