बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानच्या मैत्रिणीनं सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होत ड्रग्ज, धक्कादायक व्हिडीओ आला समोर

मुंबई | सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. एनसीबीनं मुंबई क्रुझवर टाकलेल्या धाडेत अनेकांना अटक केलं. यातच अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं एका क्रूझवरून ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासोबत त्याचा मित्र आणि काही तरुणींनाही ताब्यात घेतलं होतं. अशातच आता ड्रग्ज प्रकणात ताब्यात घेतलेल्या मुनमुन धमेचाकडून औषधांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या पार्टी प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी ड्रग्ज नेमके कुठे लपवले होते, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानबरोबर अटक झालेल्या मुनमुन धमेचाच्या पर्समध्ये असलेल्या सॅनेटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुनमुन धमेचाच्या खोलीतून एक तरुणी सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रग्जची गोळी बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, अशा पार्टींजसाठी कशाकशात दडवून अमली पदार्थ नेले जातात हे समोर येत आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट, मूनमून धामेचा हिच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली व या पार्टीशी लिंक असलेल्या आणखी 11 जणांना त्यानंतर अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी एनसीबीचा कसून तपास सुरु आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

सामनाचं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा- गोपीचंद पडळकर

काॅफीसाठी उशीर झाला म्हणून महिलेनं केलं असं काही की….

“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते”

सुखद धक्का! मुलाच्या चुकीमुळे बाप झाला करोडपती

‘राहुलजी तो दिवस लवकर उजाडो’; संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More