बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समाधान अवताडेंचा विजय निश्चित होताच देवेंद्र फडणवीसांचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल!

मुंबई |पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर दुसरीकडे राज्यातील सोलापूरमधील मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही राज्याचं लक्ष लागून होतं. या निकालात भाजपचे उमेदवार समाधान अवताडे 37 व्या फेरीनंतरही आघाडीवर आहेत. त्यामुळे अवतांडेंचा विजय होणार हे निश्चित आहे फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरमधील सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, लोक विचारतात केवळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदलंय का? अरे सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा ते बदलू आपण, असं देंवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

लोकशाहीत या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरु आहे. म्हणून या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी पहिली संधी कुणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा-पंढरपुरच्या नागरिकांना मिळालीय. म्हणून या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचं  देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत.

दरम्यान, प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे. फक्त उतावीळपणा नको, असं भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवांरांना शोधा, तुमच्या घरात शिरून भाजपने तुम्हाला ठोकलंय”

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम”

चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा- प्रकाश राज

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More