बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक घोषणा केल्या. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या 12 कोटी आहे. या 12 कोटी लोकसंख्येपैकी अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी कसे आहेत ? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल, असा सल्ला देखील त्यांंनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देणारे 5,476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More