महाराष्ट्र मुंबई

‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

मुंबई | धनंजय मुंडे प्रकरणावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याची बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करतायत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल?, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवलीय. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय.

दरम्यान, भातखळकरांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि एम. जे. अकबर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप यांची तुलना केली आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपने निलेश राणेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे

“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”

“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”

“जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या