बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मुंबई | कोरोनाने थैमान घातलं असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. राज्याने केंद्र सरकारला ऑक्सिजनसाठी मागणी केली होती. मात्र यावरून राजकारण रंगलं आहे. याबाबतच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महाराष्ट्राला ज्यादाचा ऑक्सिजन पुरवल्यावरून जाब विचारला आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला?, असं दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलं आहे. दिल्लीला दिलेला ऑक्सिजनचा कोटा पुरेसा होता, हा केंद्राचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला असून केंद्राला त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं आहेे.

महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारला गेलेला जाब म्हणजे केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत असलेल्या महा विकास आघाडीला सणसणीत थप्पड आहे. आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राने 1500 मेट्रिक टन प्राणवायूची केंद्राकडे मागणी केली होती. या राज्यांना अनुक्रमे 540 आणि 1616 मेट्रिक टन प्राणवायू पुरवण्यात आला. दिल्ली सरकारने 700 मे. टन प्राणवायूची मागणी केली असतानाही केंद्राने फक्त 490 मे. टन प्राणवायू देण्याचा निर्णय घेतला. त्यातही प्रत्यक्ष पुरवठा 340 मे. टन इतकाच झालेला आहे, अशी आकडेवारी दिल्ली सरकारच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली.

 

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

धक्कादायक! कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून अत्यंत क्रूरपणे तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More