ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होत आहे.

भारताकडून आजच्या सामन्यासाठी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानं देखील भारतीय संघात आजच्या सामन्यात पुनरागमन केलं आहे. 

दरम्यान, ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातील वादग्रस्त वक्तव्यांमुळं हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

-2019 ची लोकसभा निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई- अमित शहा

-15 लाख रुपये खात्यावर आलेला 1 खातेदार दाखवा- धनंजय मुंडे