बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिल्या ‘अमित शहा खुनी है’ अशा घोषणा!

मुंबई | सध्या राज्यात चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची चौकशी होत होती. मात्र काही दिवसातच त्यांचा मृतहेद मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे तर यावरून विरोधी पक्षाने या प्रकरणात कोणाली तर वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगपाखड पाहायला मिळाली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना जबाब देखील दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर समाधानकारक उत्तर दिलं नसून भाजप नेत्यांनी सर्व पुरावे समोर असताना सचिन वाझेंना का पाठीशी घातलं जातं आहे, असा सवाल सभागृहात केला आणि सभागृहात घोषणा दिल्या.

त्यानंतर गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आणला. तर डेलकरांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव आहे असं देशमुख म्हणाले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली मात्र त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी ‘अमित शहा खुनी है’ अशी घोषणाबाजी केली त्यावेळी मात्र वातावरण जास्तच तापलं होतं. त्यानंतर सभागृहाच कामकाज तहकूब करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या-

संतापजनक! मुख्यध्यापकानेच केला दहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार

मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख

खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार, वैज्ञानिकांनी विकसित केले नवे उपचार!

लस देण्यासाठी नर्सने हात लावला की पोलीस कर्मचाऱ्याला आवरेना हसू, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More