Loading...

अयोध्येचा निकाल देणारे ‘ते’ पाच न्यायाधीश कोण आहेत?

नवी दिल्ली | अयोध्या वादग्रस्त जागेच्या प्रकरणाचा आज निकाल आला आहे. अयोध्येतील जागा रामलल्लाचीच आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अनेक वर्षांपासून रखडेल्या या निकालाचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने दिला आहे.

गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठात देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय न्यायमूर्ती वाय बी चंद्रचूड हेही घटनापीठाचे सदस्य आहेत. खासगीपणाचा अधिकार हा मोलिक अधिकार या निर्णयात चंद्रचूड यांची महत्तावाची भूमिका होती.

Loading...

अयोध्या प्रकरणात सुनावणी करणाऱ्या घटनापीठात न्यायाधीश अशोक भूषण यांचाही समावेश आहे. भूषण 2016 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. घटनापीठांच्या पाच सदस्यांमध्ये एस अब्दुल नसीर हेसुद्धा आहेत.

दरम्याम, राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा रामलल्लाची आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे, तसेच मशिद बांधण्यासाठी अयोध्येत अन्यत्र 5 एकर जागा सरकारने उपलब्ध करुन द्यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...