परभणी महाराष्ट्र

“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”

परभणी | महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी रविवारी परभणीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केलीये.

नितीन राऊत यांनी वीजबिल माफीची घोषणा केली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा गेम केल्यामुळे नितीन राऊत यांना आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करावे लागले, असा दावा बबनराव लोणीकर यांनी केला.

महाविकासआघाडीने वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केलेली नाही. हे सरकार नापास झाले आहे, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री सहायता निधीतून होणाऱ्या मदतीचे वाटपही बंद आहे. यासाठी सहायता कक्ष नेमण्यात आला होता. या कक्षाकडे अनेक फाईल्स आल्या होत्या. यापैकी अनेकांना शासनाकडून मदतच मिळाली नाही, असंही लोणीकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत

शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे

“खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका

दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; टीम इंडियाने मालिकाही गमावली

“हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या