बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकाची कामगिरी पाहून बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

मुंबई | काल भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक विरोधी संघात विश्वचषकाचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अखेरपर्यंत चिवट झुंज दिल्याचं पहायला मिळालं. अशातच या सामन्यातील एक भावनिक व्हिडीओ आता समोर आला आहे.

पाकिस्तानच्या विजयात कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिन अफ्रिदीचा मोलाचा वाटा राहिला. कर्णधार बाबर आझमने स्वत: आक्रमक खेळी करत पाकिस्तानला चांगली सुरूवात करून दिली. त्याचवेळी बाबर आझमचे वडिल स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहत होते. त्यावेळी त्यांना आपल्या लेकाचा खेळ पाहून अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियमवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाबर आझमचे वडिल आपल्या लेकाचा खेळ पाहून भावूक झाल्याचे दिसले. याआधी 2016 साली भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, त्यावेळी माझा मुलगा येईल तेव्हा भारताविरूद्धचा रेकाॅर्ड मोडेल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर बाबर आझमने आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण केलं आहे.

दरम्यान, भारतीय संघाने पाकिस्तानच्या सामन्यात सुमार गोलंदाजी केल्याने कर्णधार विराट कोहलीला टीकेचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात भारतीय संघ चांगली कामगिरी केरेल, असा विश्वास देखील विराटने यावेळी व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More