विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

मुंबई | आमदार बच्चू कडू यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची भेट घेतली आहे. बच्चू कडू आणि आदित्य ठाकरें यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं समजतंय.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे. याचा फायदा आगामी विधानसभेत शिवसेना-भाजपला होऊ शकतो.

सध्या विधानसभेत प्रहारचा एक आमदार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचं आमचं लक्ष आहे. जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी ताकदीने मांडता येतील, असं बच्चू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बच्चू कडू शिवसेना-भाजपशी युती करण्याचा गांभिर्याने विचार करत असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’

-न्यूझीलंडला पहिला धक्का; अवघ्या एका धावेवर एक बाद

-पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती- अण्णा हजारे

-पुण्यातून 9 वर्षापुर्वी बेपत्ता झालेला तरूण छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर…

 

Google+ Linkedin