बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

अमरावती | विदर्भातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. काँग्रेसच्या उमेदवाराला धुळ चारत राज्यमंत्री बच्चू कडूंनी बाजी मारली आहे.

मतमोजनी पार पडल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांना मागे टाकत बच्चू कडूंनी दोन मतांनी विजय मिळवला. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचं सहकार पॅनल विरूद्ध बच्चू कडू यांचं परिवर्तन पॅनल अशी थेट लढत यंदा पाहायला मिळाली होती. परिवर्तन पॅनलसह बच्चू कडूही यंदा मैदानात उतरले होते.

चांदूरबाजारमध्ये बच्चू कडू आणि बबलू देशमुख यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण बच्चू कडूंनी बाजी मारली आणि 2 मतांनी विजयी झाले. यावेळी 17 जागांसाठी 48 उमेदवार मैदानात उतरले होते. तर 1687 एकूण उमेदवार होते. तर यंदाच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान झालं होतं.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलमध्ये बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखेडेसह राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज प्रत्यक्ष उमेदवार आहेत. तर बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात हे परिवर्तन पॅनल आहे. लक्षवादी ठरलेल्या या निवडणुकीत बच्चू कडूंच्या विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More