लंडन | इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कमाल केली आहे. त्याने 23 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
स्टोक्सने फलदांजी करताना 89 धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना 12 धावांत 2 बळीही घेतले. तसेच त्याने क्षेत्ररक्षणात 2 झेल घेतले.
विश्वचषकात एका सामन्यात 75 पेक्षा अधिक धावा, 2 बळी आणि 2 झेल अशी अष्टपैलू कामगिरी तब्बल 23 वर्षानंतर घडली आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या अरविंद डी सिल्वा यांनी ही कामगिरी केली होती.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने जोरदार प्रदर्शन करत सामना 104 धावांनी खिशात घातला.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक! बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या
-देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या निर्मला सीतारमण
-रावसाहेब दानवेंना मिळाली ‘या’ खात्याची जबाबदारी
-पंतप्रधान मोदींनी रामदास आठवले यांच्यावर सोपवली ‘या’ खात्याची जबाबदारी
-शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांना मिळालं ‘हे’ खातं…
Comments are closed.