महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी?; कारण ठरलं विमान

File Photo

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार प्रस्थापित झाल्यापासून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये या ना त्या कारणांवरून अनेक वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. यामध्ये आता आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे.

गुरूवारी सकाळी दहा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मसुरी येथे आयएएस अकॅडमीच्या समारोपाला जाणार होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्याचं समोर आलं.

राज्यपाल मुंबईतून राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहरादून येथे जाणार होते. त्यासाठी राज्य शासनाने चार्टर विमान पूर्व नियोजन करून उपलब्ध करून द्यावं, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं होतं. तरीही राज्य सरकारने विमान उपलब्ध करून दिलं नाही.

विमान का उपलब्ध करून दिलं नाही? याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. याबाबत भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर ते लोक देशविरोधी; सचिनला ट्रोल करणाऱ्यांविरोधात नवनीत राणा भडकल्या!

धक्कादायक! चार दिवस दारु पाजून महिलेवर सामूहिक बलात्कार

अबब… तब्बल 55 वर्षांपासून ‘या’ गावात एकाच घरातील माणूस होतोय सरपंच

अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!

जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; अरुण गवळीच्या कोरोना टेस्टचा निकालही आला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या