महाराष्ट्र सोलापूर

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भालके यांचं सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव सरकोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेत नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं.

भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या