एक दोन नव्हे तर सलग तीन वेळा जो बायडन विमानात चढताना पडले, पाहा व्हिडीओ
वाॅशिंग्टन | जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्याक्षपदाची नुकतीच शपत घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष हे जगातील सर्वात पाॅवरफुल नेते मानले जातात. पण आता हेच पाॅवरफुल नेते अशक्त होताना दिसत आहेत. एका विमानात चढत असताना बायडन एक नव्हे, दोन नव्हे तर सलग तीन वेळा पडले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
एका नियोजित कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष बायडन जात होते. राष्ट्राध्यक्षांसाठी अमेरिकेत ‘एअरफोर्स वन’ हे विशेष विमान असतं. याच विमानाच्या पायऱ्या चढत असताना बायडन तीन वेळा अडखळले आणि तिसऱ्यांदा अडखळल्यावर ते खाली पडले. पण तीन वेळा पडूनही त्यांनी स्वतःला सावरलं. त्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
आशियाई आणि अमेरिकी समुदायांच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. जोरदार वारा असल्याने बायडन यांचा तोल गेला, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. तर अमेरिकेच्या माध्यमांनी बायडन यांच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, जो बायडन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्याक्ष आहेत. आधी निवडणुकीच्या दरम्यान एका चॅनलवर चालू असलेल्या मुलाखतीत ते झोपी गेले होते. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
पाहा व्हिडीओ-
It had to be done. pic.twitter.com/7PsDHGKbiC
— Caleb Hull (@CalebJHull) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…
मोठी बातमी! मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी मिळाला आणखी एक मृतदेह!
मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण
वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय
Comments are closed.