बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बाॅस 14’ विजेती रुबिना दिलैक शोमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा करणार लिलाव

मुंबई | ‘बिग बाॅस 14′ या रियालीटी शोची विजेता अभिनेत्री रुबिना दलैक ठरली होती. शोमध्ये रुबिनाने तिच्या विचारांनी आणि सौंदर्याने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच शोच्या शेवटच्या दिवशी रुबिनाने परिधान केलेला गाऊन आता रुबिना लिलाव करणार असल्याचं समोर आलं आहे.

बिग बॉसची विनर घोषित करत असताना रुबिनाने आकर्षक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमुळे तिच्या सौंदर्याला जणू मर्यादाच नव्हती. आता गाऊनचा लिलाव रुबीना करणार आहे. ट्रान्सजेंडर समुदायासाठी काम करणाऱ्या ऑनलाईन चॅरिटी सेलमध्ये तिच्या गाऊनचा लिलाव करण्याच्या विचारात रुबीना आहे.

रुबीना कलर्स चॅनेल वरील ‘शक्तीः अस्तित्व के एहसास की’ या मालिकामध्ये एका तृतीयपंथीचा रोल प्ले करत आहे. या आधी रुबिनाने ‘छोटी बहू’ या मालिकामध्ये काम केलं आहे. या मालिकामधूनच रुबीना लोकांच्या पसंतीस आली. यानंतर रुबीना इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत वेगवेगळे पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते.

दरम्यान, देशातील कोरोना महामारीने अनेकांचा जीव धोक्यात घातला आहे तर अनेकांनी आपला जीव गमवला आहे. अशातच रुबिनाला देखील कोरोनाची लागण झाली होती. यावेळी देखील रुबिनाने होम क्वारंटाईन करुन तिच्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना काळजी घेण्यास सांगितलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

थोडक्यात बातम्या-

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More