राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप निराधार आहेत. आपण  राज्यातील ऊर्जा खात्याच्या कामगिरीबद्दल आणि वीजपुरवठ्याच्या स्थितीविषयी त्यांच्याशी खुल्या चर्चेला तयार आहे, असं आव्हान भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी निवेदनाद्वारे  केलं आहे.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीत राज्यात उर्जाखात्याने विक्रमी विजपुरवठा केला आहे, मात्र सरकारची ही कामगिरी सहन होत नसल्याने राष्ट्रवादी आरोप करत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या राज्यात निवडणुका आहेत तिथं वीज पुरवण्यासाठी महाराष्ट्र अंधारात ठेवला जातोय, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात; भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य!

-मनसेच्या इंजिनात पुन्हा इमकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

-…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

-…तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!

-फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल