तिरुअनंतपुरम | केरळमध्ये 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे. पण केरळमधील एका ज्येष्ठ भाजप नेत्यानेच भाजपला घरचा आहेर दिला आहे.
केरळमधील भाजप नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
केरळमध्ये भाजपला मोठं समर्थन न मिळण्यास दोन-तीन कारणं आहेत. केरळचा साक्षरता दर 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात. शिक्षित लोकांची ही सवयच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आहेत, आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाबही येते. त्यातच, केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही, असं राजगोपाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राजगोपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत, राजगोपल यांनी केलेलं वक्तव्याचा कोट शेअर केला आहे. तसेच फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.
भाजपा का झूठ पूरा देश समझने लगा है, उन्हें जो सपने दिखाए गए थे उन्हें भाजपा ने पूरा करना तो दूर उसके बिल्कुल खिलाफ काम कर रही है।सिर्फ केरल ही नहीं,अब पूरा देश भाजपा को वोट नहीं देगा। pic.twitter.com/lOAKD8xvry
— Congress (@INCIndia) March 25, 2021
थोडक्यात बातम्या-
मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला
“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.