बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ सापडलेल्या भाजप नेत्याला बायकोने धू धूतलं, पाहा व्हि़डीओ

लखनौ | गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स करणं भाजप नेत्याच्या अंगलट आलं आहे. या भाजप नेत्याच्या बायकोने त्याला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं आणि रस्त्यातच चप्पलेने चोप दिला.

मोहित सोनकर असं या नेत्याचं नाव असून ते कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री असल्याची माहिती समोर आली आहे. तर कारमध्ये असलेली महिला देखील भाजप नेता असल्याचं समोर आलं.

दरम्यान, आनंदपुरी सोसायटीच्या कँपसमध्ये सोनकर यांची पत्नी व सासू यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं व रस्त्यातच चपलेने धुतलं. पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र सगळ्यांदेखत सोनकरच्या सासरच्या मंडळींनी त्यांना बेदम मारहाण केली. यात भाजपच्या महिला नेत्या देखील जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More