बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”    

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्यावर सोपवली पाहिजे’, असं मत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केलं आहे. भारतानं मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचं संकट ज्याप्रमाणे परतावून लावलं तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचं पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्र नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्षवर्धन अधिक खुलून काम करतील, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत, हे लक्षात घ्यावं. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे. यामध्ये नितीन गडकरी यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे, असंही स्वामींनी म्हटलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या या प्रस्तावाचं ट्विटवरवर अनेकांनी स्वागत केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे झपाट्यानं काम करण्यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला ते मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरींकडे सोपवणार का, हे पाहावं लागेल.

थोडक्यात बातम्या

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

शिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी

तरुणीने सॅनिटायजर पिऊन कापली हाताची नस; नाशिकमध्ये एकच खळबळ

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More