बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, नार्वेकर म्हणाले, ‘यांना गाडीत टाका शिवबंधंन बांधू’

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार फटकेबाजी चालू आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच आज विधान भवनात खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं आहे.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर येत होते. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड विधान भवनाच्या आवारातंच उभे होते. हे सर्व भाजप नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतानाच पाठीमागून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची कार तेथे आली. मुख्यमंत्र्यांना पाहून नार्वेकर खाली उतरले. यावेळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अगदी दिलखुलास संवाद झाला.

गाडीतून खाली उतरत मिलिंद नार्वेकर म्हणाले की, उद्धव साहेब या सर्वांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? यावर उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांच्या उत्तरावर नार्वेकर मिश्कीलपणे म्हणाले की, यांना आत्ताच गाडीत टाका आपण शिवबंधन बांधुयात. यानंतर उपस्थित नेत्यांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More