Top News

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजपच्या माजी आमदाराचं वक्तव्य

मुंबई | ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच पंतप्रधान मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच, असं वादगस्त वक्तव्य भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचंं नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचं हळवणकर यांनी म्हटलं आहे.

छत्रपती उदयनराजे यांच्यासह संभाजी राजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हा वाद शांत झाला असं वाटत असतानाच हळवणकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आह. यामुळे पुन्हा नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराजांनी केलेले काम आणि पंतप्रधान मोदी करत असलेल्या कामकाजात साधर्म्य असल्याचा फुटकळ दावाही हळवणकरांनी केला. मोदी राबवत असलेल्या योजनांचे दाखले देत आपल्या वक्तव्याचं समर्थन करण्याचा प्रयत्नही हळवणकर यांनी केला.

ठळक बातम्या-

…म्हणून आढळरावांचे पीए खासदार अमोल कोल्हेंच्या दरबारी!

“शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न मोदींनाच विचारा”

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या