Top News महाराष्ट्र मुंबई

भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण

मुंबई | बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी माहिती दिली आहे.

मनालीमध्ये ते  काही दिवसांपासून राहत होते. सनी देओल यांना ताप आणि गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केल्याने त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित ठाकुर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमागे सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते आराम करण्यासाठी मनालीमधील आपल्या फार्महाऊसवर थांबले होते. 3 डिसेंबरला ते मुंबईला येणार असल्याची माहिती समजत आहे. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत.

 


महत्वाच्या बातम्या-

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी

‘2021 मध्ये सर्वांना कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे…’; रामदेव बाबांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

“स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या