बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

मुंबई |  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात ‘काँग्रेसची खाट का कुरकुरतेय’ या शीर्षकाखाली आज अग्रलेख लिहित सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने देखील राऊतांना लगोलग प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या या राजकीय चालीवर भाजप नेते राम कदम यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटचा खाटाचा बघा?, अशा शब्दात राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये स्वाभिमान शिल्लक आहे काय? अशी विचारणा केली आहे.

 

 

शिवसेनेच्या काँग्रेसवरील टीकेनंतर सकाळपासून राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं आहे. शिवसेनेचा अग्रलेख काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आजचा सामनाचा अग्रलेख हा अर्धवट असून त्यातील माहिती ऐकीव स्वरूपाची आहे, अशा शब्दात थोरात यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमची भूमिका मांडल्यानंतर सामनाला पूर्ण माहितीच्या आधारे अग्रलेख लिहावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मनाच्या अग्रलेखात संजय राऊत काय म्हणाले होते- 

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ श्री. उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही”

“काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे”

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली आणि तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की ‘सरकारला अजिबात धोका नाही”.

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका

सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More