बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा गमतीदार व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता बॉबी देओल मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा दुसरी इनिंग खेळत आपले नशीब आजमावत आहे. वेब सीरीजच्या माध्यमातून पदार्पण करत गेल्या काही काळात बॉबी देओलने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो एक शक्तिशाली अभिनेता आहे. बॉबी देओलचा एक मजेदार मीम व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो कोरोनाच्या नियमांशी तंतोतंत जुळणारा असून, सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी बॉबी देओलच्या काही चित्रपटांच्या वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून एक भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये बॉबी देओल कोरोनाचे सगळे नियम पाळून सर्व काम करत आहेत आणि म्हणत आहेत की, आजकाल कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सांगितले जात आहे. बॉबी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडीओ बॉबी देओलच्या एका फॅन अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीस बॉबी देओल म्हणतो, ‘क्योंकि मैं वो साफ साफ देख सकता हूं, जो आप नहीं देख सकते’. यानंतर हा व्हिडीओ सोशल डिस्टसिंगशी कनेक्ट होत असल्याचे दाखवले आहे. जेथे बॉबी देओल सनी देओलला म्हणतो, ‘हाथ मत लगाना भैया, कहीं ये बीमारी मुझे भी न लग जाए’.

दरम्यान, या व्हिडीओ पुढे बॉबी देओलने एक मास्क घातलेला आहे आणि दुसऱ्या एका दृश्यात बॉबी देओल घराला अनेक कुलूप लावत असलेले दाखवले आहे. बिच्छू चित्रपटाच्या दृश्यात बॉबी देओल घरात अनेक कुलपे लॉक करताना दिसला होता. हे दृश्य क्वारंटाईन जोडण्यात आले आहे. त्याचवेळी पुढे बॉबी देओल आपले हात धुताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!

खळबळजनक! दिल्लीत भाजप नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More