बुलडाणा महाराष्ट्र

कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात महिनाभर पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊनचे आदेश

बुलडाणा | कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ लागलं आहे. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाकडून आता काही कठोर निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ होत असल्यानं संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाकडून आता कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.

21 जुलै ते 21 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण एका महिन्यासाठी हा लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दूध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.

सोमवार ते शुक्रवार संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय फक्त सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत दूध, वृत्तपत्र वितरण करण्यासाठी मुभा असणार आहे. या गोष्टी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु महिनाभर लागू असणार आहे.

दरम्यान, या काळात सोशल डिस्टंसिंगचं तंतोतंत पालन करण्याचं यावं, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. संचारबंदीच्या काळातही विनाकारण बाहेर फिरणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी यावेळेस दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात पुढील 48 तास मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

अजितदादांच्या वाढदिवसाला पुतण्या रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट! 

राम मंदिर भूमिपूजनाच्या यादीत रंजन गोगोईंना मानाचं स्थान मिळायलाच हवं- संजय राऊत

मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही- उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संकटात मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, लहान मुलांना होतोय ‘हा’ आजार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या