शहीद कॅप्टल कपिल कुंडू यांचं फेसबुकवरचं स्टेटस खरं ठरलं!

गुरुग्राम | 23 व्या वाढदिवसाला अवघे 6 दिवस बाकी असताना कपिल कुंडू यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलं. “जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं”, हे त्यांच्या फेसबुकवर लिहिलेलं वाक्य त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं सार्थ ठरलं. 

हरियाणाच्या गुरुग्रामचे राहणारे कॅप्टन कपिल कुंडू 2012 मध्ये एनडीएमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते सैन्यात रुजू झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कुंडू राजौरीमध्ये तैनात होते.

दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हेच त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या दोन बहिणींची लग्न झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.