बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही”

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा रद्द झालेला कायदा आणि आरक्षणासाठी पुढं कोणती पावलं उचणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर तुम्हाला देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तुम्ही शासन करताय ना? मग जबाबदारी घ्या, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच तुमचं केंद्रात आणि राज्यात वर्षानुवर्ष राज्य होतं. मग तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही?, कारण तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं आणि आत्ताही द्यायचं नाही, असं पाटील म्हणाले.

आत्ताही बॉल तुमच्याच कोर्टात आहे. 102व्या घटनादुरुस्तीनुसार त्या त्या राज्याच्या मागास आयोगाने त्या राज्यातल्या एखाद्या जातीला मागास ठरवायचं. मग ते केंद्राच्या मागास आयोगाला पाठवायचं. मग त्यांनी ते राष्ट्रपतींना पाठवायचं आणि नंतर पुन्हा कायदा राज्य सरकारनेच करायचा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. महाराष्ट्रात मागास आयोगच नसून केंद्रात आहे. गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर नवीन मागास आयोगाची नियुक्ती केलेली नाही. ती आधी करा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून पिंपरीच्या पोलीस आयुक्तांनी केलं वेशांतर, बनले जमालखान कमालखान पठाण अन्…

“…अन्यथा एकाही मराठा आमदार, खासदार आणि मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही”

किती ती क्रूरता! गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर पोलिसाचा लाथ मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

#सकारात्मक_बातमी | दोन वेळा बायपास झालेल्या 74 वर्षीय पैलवानाची कोरोनावर यशस्वी मात

“पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More