Top News

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिाया दिली आहे. पोलिसांनी पूजाचा लॅपटॉप तपासला नाही. लॅपटॉप तपासल्यानंतर याबाबत आणखी उलघडा होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.

पोलिसांवर हल्ला करणारे मंत्री तुमचे! कार्यकर्त्यांना घरी नेऊन मारहाण करणारे मंत्री तुमचे! 15 वर्षापासून एका महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवणारे मंत्री तुमचे! असे अनेक आरोप  सरकारच्या अनेक मंत्र्यांवर आहेत. त्यात भर म्हणून पूजा चव्हाण प्रकरणात देखील शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव समोर येणं ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

जर या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी योग्य भुमिका घेतली नाही आणि दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही, तर जनतेचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मूळची परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने आत्महत्येचं पाऊल उचललं. पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. महाविकास आघाडी सरकारधील एका बड्या मंत्र्यासोबत तीचे प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून तीने आत्महत्या केल्याची चर्चा होती. भाजपने देखील हा मुद्दा उचलून धरला असून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

“होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

‘नाद करा पण आमचा कुठं’, हेलिकॉप्टरमधून येत ‘या’ गावच्या सरपंचानं घेतली शपथ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या