महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील
मुंबई | राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा हवाला देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केलं आहे तर त्या ट्विटमध्ये त्यांनी मार्च महिन्यात राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांबाबतचा अहवाल दिला आहे.
आज रविवार आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा 10-12 दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी अशा तिखट शब्दात त्यांनी टीका केली आहे.
2 मार्चला जम्बो कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून महिलेचा विनयभंग तर 3 मार्चला औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न, 4 मार्चला जळगावमध्ये पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचवलं, 6 मार्चला शिक्षिकेचा विनयभंग करून तिला धमकी देण्यात आली, 7 मार्च -पैशांसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला, 8 मार्चला महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केला, 11 मार्चला 7 महिन्यांच्या बाळासह महिलेची गळफास लावून आत्महत्या आणि12 मार्चला पित्याकडून मुलीवर अत्याचार या घटनांचा हवाला देत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार?, या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार असून झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार असे सवाल पाटलांनी सरकारला केले आहेत.
आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. pic.twitter.com/xVWwGF6aQv
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 14, 2021
थोडक्यात बातम्या-
अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!
“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”
“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार
‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती
Comments are closed.