बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमची भूमिका जरा बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजे- चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत भाजप आणि मनसे युतीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी या भेटीचा तपशील दिला आहे. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तुमची भूमिका जरा बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजे, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांन सांगितलं.

नाशिकमध्ये आमची भेट झाली तेव्हा त्यांनी मला घरी चहा प्यायला बोलावलं होतं. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो. मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावलं मी गेलो. निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आलो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट संजय राऊतांना चँलेंज दिलं आहे. जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर, संजय राऊतांनी मुंबई महापालिकेतची निवडणूक लढवून दाखवावी, असं खुलं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“अजित पवार सकारात्मकता दाखवतात पण, मुख्यमंत्री वेगळेच आदेश देतात”

राज्यपालांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊतांचा सवाल

लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, प्रत्येकी ‘इतक्या’ हजारांची मदत मिळणार

“…तर पवारांची लोंबतेगिरी करणाऱ्या संजय राऊतांवर ही वेळ आली नसती”

…तर आंदोलनात मी स्वत: सहभागी होईल- अण्णा हजारे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More