मध्य प्रदेशप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजप सत्ता राखणार!

नवी दिल्ली | मध्य प्रदेशप्रमाणे छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल, असा अंदाज टाईम्स नाऊच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. 2 जागांचा फटका बसेल मात्र भाजपचं स्पष्ट बहुमताचं सरकार छत्तीसगडमध्ये विराजमान होईल, असा हा सर्व्हे सांगतो. 

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. यापैकी 47 जागा जिंकण्यात भाजपला यश येईल तर काँग्रेसला 33 जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. 

छत्तीसगडच्या 90 विधानसभा मतदारसंघांतील 9 हजार 765 लोकांचा कौल या सर्व्हेत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी 55 टक्के लोकांनी भाजपच्या रमण सिंह यांना पसंती दिली आहे. 10 टक्के लोकांनी छत्तीसगड जनता काँग्रेसचे अजित जोगी यांना तर 8 टक्के लोकांनी काँग्रेसचे भुपेंद्र बघेल यांना पसंती दिली आहे. 

कोणत्या राज्यात काय होणार?-

-राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कुणाची सत्ता?

-शिवराज सिंग पास होणार; मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार!

-राजस्थानमध्ये भाजपला मोठा झटका; काँग्रेसची सत्ता येणार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या