उस्मानाबाद | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
राज्यात अवकाळी पडलेल्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भागातील पीकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 19 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचे मदतीचे चेक दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज
“उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”
3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात