खरेदीदार सापडला; मात्र गेलला बॅटिंग मिळणार नाही?

बंगळुरु | आयपीएल लिलावाच्या अंतिम क्षणी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर पंजाबनं जुगार खेळला, मात्र तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. 

पंजाबनं त्याला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं. मात्र त्याला संघ राखीव सलामीवीर म्हणून पाहात असल्याचं संघाचा मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागनं सांगितलंय. 

एकवेळ अशी होती की गेलला खरेदी करण्यास कुणी तयार नव्हतं, तेव्हा पंजाबनं त्याच्यावर बोली लावली. त्यामुळे गेलच्या चाहत्यांमध्ये आनंद होता. मात्र आता त्याचं खेळणं अनिश्चित असल्याचं समोर येतंय.