मुंबई | सध्या सर्वत्र उन्हाचा हाहाकार माजलाय. देशाच्या अनेक भागात नागरिकांना घराच्या बाहेर यायला देखील नको वाटत आहे. काही भागात तर उष्णतेमुळं नागरिकांना आरोग्याचा त्रास व्हायला लागला आहे. अशातच हवामान विभागानं गंभीर इशारा दिला आहे.
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या पाच राज्यांना उष्णतेची लाट येण्याबाबत इशारा देण्यात आला आहे. या भागात 45 डिग्री सेल्सियस पेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, विदर्भ, गंगेच खोरं, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या भागात देखील अधिक उष्णता असणार आहे. अशातच काही राज्यात विजेचा वापर वाढल्यानं यंत्रणेवर ताण देखील वाढला आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळं अनेक भागातील नागरिकांना शेतातील आपली काम करत येत नाहीत. अशात आरोग्याच्या समस्या देखील वाढत आहेत.
थोडक्यात बातम्या –
बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
‘ये भोगी’ म्हणत अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; दरमहा ‘इतके’ हजार मिळणार
“मी कधीच आई होऊ शकत नाही”, भर कार्यक्रमात अभिनेत्री ढसाढसा रडली
मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के; ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
Comments are closed.