जास्त वजनामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग!

नाशिक | जास्त वजनामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं.  मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत झालेली ही तिसरी घटना आहे. 

मुख्यमंत्री सारंगखेड्याच्या यात्रेनंतर औरंगाबादला निघाले होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये जास्त वजन झाल्याने नाशिकात स्वयंपाक्याला उतरवण्यात आलं. त्यानंतर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांसह औरंगाबादला रवाना झाले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर औरंगाबादमध्ये सुखरुप उतरल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय.